सौताडा धबधबा

सौताडा हे स्थळ पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे.

येथे दरीत भगवान राम आणि सीता यांनी महादेवाचे एक मंदिर बनवले आहे. या मंदिरास रामेश्वर म्हणून ओळखले जाते

श्रावण सरी बरसल्या नंतर, नदीला भरती आल्यावर कसा सुंदर धबधबा पडतो त्याचं अलौकिक दृश्य पाहायला मिळेल. मराठवाड्यातील महाबळेश्वर म्हणून ज्याची ओळख आहे असे सौताडा रामेश्वर येथील पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर व त्याच्या जोडीला असणारी खोल दरी आणि त्या दरी मध्ये उंचावरून कोसळणारा प्रचंड धबधबा या निसर्गातील सौंदर्याचे खऱ्या अर्थाने आपण अवलोकन करून हृदयात भरून ठेवावे असेच आहे. खरोखरच हे सौंदर्य पावसाळ्यामध्ये अधिकच खुलते आणि ते पाहण्यासाठी नक्कीच एकदा तरी आपण भेट द्यावी असे हे ठिकाण .

रामेश्वर सौताडा हे गाव नगर बीड हायवेवर बीड जिल्ह्याचे सुरुवातीचे गाव आहे. याठिकाणी निसर्गाचा अलौकिक व सुंदर चमत्कार आपल्यास पाहायला मिळेल कारण या ठिकाणी असलेली खोल दरी व त्या दरी मध्ये कोसळणारा धबधबा. त्याहीपेक्षा दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या मोठ्या मुख्य धबधब्या बरोबरच इतर छोटे-मोठे अनेक धबधबे व हिरवा शालू नेसून नटलेला सर्व परिसर तसेच या परिसरातील छोटे-मोठे ओहळ ते सुद्धा खूप सुमधुर असे गीत गातात. मनाला आनंद व नवचैतन्य देतात. या सर्व छोट्या-मोठ्या धबधब्यांचा आवाज जरी आपण ऐकला तरी सुद्धा मन प्रसन्न होऊन जाते. म्हणूनच मी या छोट्या धबधब्यांचा व छोटा सा संकलित विडिओ तुमच्या साठी पाठवला आहे. नक्की पहा तुम्हाला एक निसर्गाची उत्तम सहल केल्याचा अनुभव मिळेल.

पत्ता : श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर, जामखेड-बीड रस्ता, सौताडा, तालुका पाटोदा, जिल्हा बीड
जामखेडपासून सात किलोमीटर अंतरावर जामखेड-बीड रस्त्यावर

Similar Posts