माणकेश्वर मंदिर

माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार –

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात माणकेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आहे. – मंदिरावर उत्कृष्ट पद्धतीने कोरीव काम करण्यात आले आहे. – तेथील वास्तुकलेमधील विविध कलाकृती लक्ष वेधून घेतात. – मंदिराच्या खोल भागात महादेवाची मोठी पिंड आहे. – मंदिरासमोर नंदीमंडप असून त्यात मोठ्या आकारातील नंदी आहे. – चालुक्य काळात मंदिराचे बांधकाम झाले असल्याचे अनुमान काढले जाते.

महाराष्ट्रातील अगदी प्राचीन उत्तम शिल्पाविष्कारांनी नटलेली मंदिरे मोजायची झाल्यास एका हताची पाच बोटेही पुरेशी आहेत. अंबरनाथ बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, अन्व्याचे मंदिर आणि पाचवे नाव घ्यावे लागते ते माणकेश्वर मंदिर (ता. परंडा जि. उस्मानाबाद) च्या मंदिराचेच.हीच नावं का घ्यायची तर या मंदिरांच्या बाह्य भिंतींवरील (जंघा) अप्रतिम असा माणकेश्वर मंदिरावरील अप्रतिम शिल्पाविष्कार. आणि दुसरं म्हणजे यांचे प्राचीनत्व.

माणकेश्वर मंदिर बाराव्या शतकांतील आहे. औरंगाबाद उस्मानाबाद रस्त्यावर कुंथलगिरीपासून उजव्या हाताच्या रस्त्याला वळलो की डोंगररांगांतून एक छानसा रस्ता जातो. टेकड्या हिरवळ तळे असा निसर्गसुंदर परिसर. या रस्त्याने भूम पर्यंत गेल्यावर तेथून 11 किमी दक्षिणेला माणकेश्वर गाव आहे. विश्वकर्मा नदीच्या चंद्राकृती वळणावरची नयनरम्य जागा शोधून या मंदिराची उभारणी केल्या गेली आहे.

पत्ता : माणकेश्वर मंदिर, माणकेश्वर, ता.भूम. जि.उस्मानाबाद -413504
तांबेवाडी किंवा वांंगी बुद्रूक

उस्मानाबाद पासून सुमारे ५५ किमी तर भूमपासून जवळपास १९ किमी अंतरावर आहे. तेथून वाहन व्यवस्था होऊ शकते.

Similar Posts