जांभूळ बेट
खरंच निसर्गाची किमया भारी….
मराठवाड्यातील एकमेव बेट… जांभूळ बेट
गोदावरी नदी पात्रात मध्यभागी वसलेले जांभूळ बेट हे एक निसर्गरम्य ठिकाण असून याच्या चारही बाजूने पाणी आहे जांभूळ बेटावर जाण्यासाठी होडीच्या साह्याने जावे लागते परभणी जिल्ह्यातील हे एक निसर्गरम्य ठिकाण असून या बेटावर पोचताच जांभळाची खूप जुनी अशी झाडे पाहावयास मिळतात त्यामुळेच त्याला जांभुळबेट हे नाव पडले आहे या बेटावर निसर्गाच्या अद्भुत अविष्काराचा अनुभव येतो याठिकाणी राज्यभरातील पर्यटकांची अतूट गर्दी असते.
“बेटावरची झाडे ही यापूर्वी कोणी लावलेली नसून ती पशु-पक्षी यांच्या माध्यमातून बियांचा प्रसार आणि निसर्गतःच आलेली आहेत. बेटाच्या सर्व बाजूने पाणी असल्याने या ठिकाणचे तापमान समस्वरूपात असून वातावरण आल्हादायक, उत्साहवर्धक आहे. त्यामुळे अशा वातावरणात जर आपण वेळ घालवला तर एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. जैव विविधतेच्या दृष्टीनेही हे बेट महत्वपूर्ण आहे.
निसर्गानी वेढलेल्या या बेटावर अगदी मध्यभागी पुरातन असे मारुतीचे मंदिर आहे चारही बाजूंनी जांभळाच्या झाडांची गर्दी व मोरांचे थवे आणि इतर पक्ष्यांची वर्दळ असते .
पालम येथून वाहने उपलब्ध.
पत्ता : जांभूळ बेट, ता. पालम, जि. परभणी – 431720